मुफ्तीचा अर्थ ‘रोजच्या वापरातील कपडे’ (Casual Dressing). मुफ्त या शब्दाशी याचा काहीही संबंध नाही. तर, हा शब्द आला आहे सैन्यातून. सैन्यातील गणवेषाशिवाय इतर जे रोजच्या वापरातील कपडे असतात त्यांना मुफ्ती म्हणतात. या शब्दाचा आर्थ सांगण्याचं कारण असं, की हा एक साधा शब्द घेऊन फक्त १०,००० रुपये भांडवल असलेला व्यवसाय आज तब्बल ३०० कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कमल खुशलानी यांच्या मुफ्ती कंपनीची ही यशोगाथा.
१०,००० रुपये व्याजावर घेऊन ३०० कोटींची कंपनी कशी उभी राहिली? ही यशोगाथा प्रत्येकाने वाचायला हवी !!


कमल यांनी मुफ्तीची सुरुवात १९९८ साली केली. त्यांना वाटायचं की भारतीय फॅशन उद्योग हा आंतरराष्ट्रीय बाजारातही जाऊ शकतो. हे लक्ष्य समोर ठेवून त्यांनी मुफ्तीची सुरुवात केली. पण मुफ्ती सुरु करणे सोपे नव्हते. त्यामागे एक प्रवास आहे. तो आधी जाणून घेऊया.
कमल यांचे वडील ते १९ वर्षांचे असतानाच वारले. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता, पण खिशात पैसे नव्हते. पोटापाण्यासाठी ते व्हिडिओ कॅसेट कंपनी चालवायचे, पण त्यांना फॅशन उद्योगात जायचं होतं. शेवटी त्यांनी मावशीकडून १०,००० रुपये व्याजावर घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

या कंपनीचं नाव होतं ‘Mr & Mr’. ही कंपनी पुरुषांसाठी शर्ट्स तयार करायची. सुरुवातीच्या काळात कंपनीला मिळालेला प्रतिसाद चांगला होता, पण कमल यांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. त्यांना फॅशन उद्योगातील आणखी वाटा धुंडाळायच्या होत्या. याच महत्त्वाकांक्षेतून मुफ्तीचा जन्म झाला.
कमल यांनी आपल्या एकट्याच्या खांद्यावर मुफ्ती उभी केली. सुरुवातीच्या काळात ते काही किलो वजनाचे कापड बाईकवरून वर्कशॉपवर नेऊन द्यायचे आणि येताना तयार कपडे घेऊन यायचे. काही वर्ष तरी सर्व कामाची धुरा त्यांच्यावरच होती.

२००० च्या काळात मुफ्तीची घोडदौड सुरु झाली. एकाच प्रकारच्या कपड्यांपासून ते हरतऱ्हेच्या कपड्यांपर्यंत मुफ्ती पसरलं. कमल म्हणतात की त्यांनी मुफ्ती हे नाव घेतलं कारण त्यांची कंपनी वेगळ्या प्रकारचे कपडे विकत होती. वेगळ्या प्रकारचे आणि नेहमी आपण जे फॉर्मल्स कपडे घालतो त्यापेक्षा वेगळे या अर्थाने मुफ्तीची सुरुवात झाली.
मुफ्तीला मिळणारं कापड हे भारतातल्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून येत होतं. अरविंद मिल्स, केजी डेनिम, एनएसएल, मफतलाल यांसारख्या कंपन्यांकडून कापड मागवलं जात असे. बटन आणि इतर गोष्टी यासुद्धा भारतातल्या वेगवेगळ्या भागातून मागवल्या जायच्या. २०१७ साली मुफ्तीने चपलांच्या व्यवसायात उडी घेतली. आज भारतातल्या १०० वेगवेगळ्या दुकानांमध्ये मुफ्तीने तयार केलेले मेन्स शूज मिळतात. दरवर्षी कंपनीकडून जीन्स, टी-शर्ट, जॅकेट, शॉर्ट्स प्रकारातले ५०० वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारात आणले जातात. कंपनीत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६०० कर्मचारी थेट कंपनीशी जोडलेले आहेत, तर २००० कर्मचारी अप्रत्यक्षपणे काम करतात.

गेल्यावर्षी मुफ्तीच्या एकूण व्यवसायातून तब्बल ३९५ कोटी रुपये नफा मिळाला होता. येत्या काळात आहे त्या व्यवसायात ११ टक्क्यांची वाढ होईल असं म्हटलं जात आहे. १०,००० रुपये घेऊन सुरु केलेला हा व्यवसाय आज ३०० कोटींची उलाढाल करणारा भारतातला एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे.

अर्थातच, हे सोप्पं नव्हतं. कमल खुशलानी यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळेच हे शक्य झालं. त्यांच्या उदाहरणावरून अनेकांना नवीन व्यवसायासाठी उर्जा मिळेल यात शंका नाही.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१