दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे पांडवांनी हातात घेतली असे महाभारतात सांगितले आहे, म्हणून दसर्याला शस्त्राचे पूजन केले जाते. पण मंडळी, सध्याचे दिवस छुप्या युध्दाचे, अघोषित युध्दाचे आहेत. सतत शस्त्र सज्ज असण्याला आता पर्याय नाही, कारण रात्र वैऱ्याची आहे.
गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी आपण यशस्वी सर्जीकल स्ट्राईक केला होता. या प्रसंगी वापरलेल्या शस्त्रांचा आढावा घेणे म्हणजे एक प्रकारची शस्त्रपूजाच! चला तर बघू या ही सर्व शस्त्रे आहेत तरी कोणती !!!






