अगदीच साधी राहाणी नसेल तरी एकवेळ ठीक आहे. पण असलेल्या/नसलेल्या श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन नसावे. या वरच्या चित्रातील नववधू पोषाखावरून नक्कीच भारतीय वाटत आहेत. हे भले मोठाले हार, दोन्ही कानांतले झुमके एकत्र केले तर चेहरा दिसणारच नाही अशी परिस्थिती हे अगदी अशी संस्कृती जोपासनार्यांची कीव करावी असेच आहे.
एकाने असे केले म्हणून दुसर्याला तसेच करण्यासाठी सामाजिक दडपण येते. यातूनच हुंडा संस्कृती उदयास आली. बहुतेक ठिकाणी हुंडा दिला-घेतला जात नसला तरी अन्य मार्गाने त्याचे कोणते ना कोणते रूप लग्नसमारंभात दृष्टीस पडतेच. दक्षिणेत अजूनही गळ्यापासून कमरेपर्यंत आणि मनगटापासून दंडापर्यंत सोन्याने मढलेल्या नववधू दिसतातच. अशा वेळेस मुलगी जन्माला येणं ही काही सुखकारक घटना नक्कीच वाटणार नाही.
चांगले शिक्षण आणि ज्ञान हेच खरे अलंकार.
