सध्या जिकडेतिकडे ’काला चश्मा जँचता है’ गाजतं आहे. गाणं पाहाताना सिद्धार्थकडे लक्षच जात नाही आ्णि कतरिना कैफवरून नजर हटत नाहीय. कालपासून ’बार बार’ एकबार भी मत देखो म्हणून फेसबुक पोस्ट्स फिरत असल्या तरी त्यामुळे गाण्याच्या पॉप्युलॅरिटीवर काही फरक पडत नाही.
पण तुम्हाला माहित आहे, हे गाणं १९९०मध्येच लिहिलं गेलं होतं. ते ही जालंधरजवळच्या एका खेड्यातल्या पंजाबच्या पोलिस खात्यातल्या अमरिक सिंग नावाच्या हेड कॉन्स्टेबलने. गंमतीची गोष्ट अशी की त्याचं हे गाणं सिनेमात घेतलं गेलंय ते केवळ ११,०००रूपयांच्या मोबदल्यात. ज्या गाण्यावर सिनेमाचं प्रमोशन झालं, तेच गाण्ं निर्मात्याला इतकं स्वस्त पडलंय. अमरिक सिंगना सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळेस बोलावणं येईल असं म्हणे वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही.
जालंधरच्या एका म्युझिक स्टुडिओने सध्या त्याला त्याच्या इतर गाण्यांसाठी विचारलं आहे. कदाचित बॉलीवूडला नवा गीतकार मिळण्याची ही चांगली संधी असू शकते.