गेल्या काही दिवसांत तुमच्या मेलबॉक्समध्ये काही विशिष्ट औषधांचा प्रचार करणार्या मेल येऊन पडत असतील.प्रत्येक वेळा नाव वेगळं असेल,पण त्यात लपलेलं औषध तेच असेल!
या मेलचा सारांश सर्वसाधारणपणे असा असतो.
'जुनाट दुखण्यामुळे - कॅन्सरसारख्या व्याधीमुळे किंवा इतर कोणत्याही शारिरीक त्रासाने जर वेदना शमत नसतील तर ही औषधे घेऊन बघा. वेदनामुक्त जीवन जगा.'
साहजिकच तुमच्या मनात प्रश्न असा उभा राहील की खरोखर या औषधांनी वेदना थांबतात का? तर त्याचे उत्तर असे आहे की, होय! या औषधांनी वेदनामुक्त जीवन जगता येते. हे उत्तर वाचल्यावर तुम्ही विचाराल की हे औषध इतके चांगले असेल तर त्या औषधांपासून सावध रहा असा बोभाटा आम्ही का करतो आहे?








