तासनतास खुर्चीवर बसून वर्क फ्रॉम होम केल्याने आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत असताना दिसत आहेत. याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या वजनावर होताना दिसतो. कंबरेजवळ आणि पोटावर अतिरिक्त चरबी साठतेय. या वाढत्या वजनामुळे अनेक लोक तणावाचे शिकारही होत आहेत. वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा फार पूर्वीपासून औषधाच्या स्वरुपात वापर करण्यात येत आहे. कमरेवरील चरबी घटवण्यासह शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत,अॅपल सायडर व्हिनेगर खूप लाभदायक आहे. आज आपण याची सविस्तर माहिती घेऊयात.
अॅपल सायडर व्हिनेगर सफरचंदापासून तयार केला जातो आणि सफरचंदात आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक गुणधर्म असतात. हे सर्व शरीराला चांगले पोषण देतात. इतर कोणत्याही व्हिनेगरच्या तुलनेत अॅपल सायडर व्हिनेगर मध्ये भरपूर जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. हे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.
अॅपल सायडर व्हिनेगर अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. तुम्ही सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून याचा वापर करू शकता. ते कोणत्याही पेयात मिसळून पिऊ शकता. जर तुम्ही खास डिश बनवत असाल तर त्यातही त्याचा वापर करता येईल. याशिवाय कित्येक प्रकारच्या पाककृतींमध्येही याचा उपयोग केला जातो. व्हिनेगरमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. त्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. इतर अनेक फायदे खालीलप्रमाणे आहेत.


