ऐकावे ते नवलच! हे बाळ जन्मतःच गरोदर होते.

ऐकावे ते नवलच! हे बाळ जन्मतःच गरोदर होते.

राव, रोज काहीतरी नवीन चक्रावून टाकणारं आपल्या आजूबाजूला घडत असतं. असाच एक प्रसंग घडलाय मुंब्र्यात. एका नवजात अर्भक जन्मतःच गरोदर होतं.  तर या प्रकाराला मेडिकल भाषेत 'फिट्स इन फीटू' असे म्हणतात. आजवर जगभरात अशा फक्त दोनशे  केसेस रेकॉर्ड झाल्या आहेत म्हणे.

या बाळाच्या जन्माआधी जेव्हा सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना ही केस लक्षात आली. त्यांना या बाळाच्या पोटात दुसरं बाळ दिसू लागलं.  त्यांना त्यात हातापायाची हाडं आणि एक छोटेसं डोकं पण दिसलं. या प्रकाराने  आश्चर्यचकित झालेल्या डॉक्टरांनी त्वरीत शस्त्रक्रिया करून 150 ग्राम वजनाच्या गर्भाला अर्भकाच्या पोटातून काढून टाकले. 

अशा केसेसमध्ये दोन्ही अर्भकांना अन्नाचा पुरवठा एकाच नाळेतून होत असलयामुळे ज्या बाळाच्या पोटात जुळं बाळ आहे,  त्याच्यासाठी हे खूप धोकादायक असतं. पण मुंब्र्याचं बाळ सध्यातरी सुखरूप आहे आणि धोक्यातून बाहेर पडेल अशी आपण आशा करूयात...