लसणाच्या उग्र दर्पामुळे लसूण खाणे टाळले जाते. लसूण वापरून केलेल्या पदार्थांची खाल्ल्यानंतर चव जीभेवर कायम राहते किंवा उग्र दर्पाच्या ढेकरा येतात हे जरी खरे असले तरी होणार्या फायद्यांची यादी वाचली तर आहारात लसूण असणे किती आवश्यक आहे हे कळेल. लसणाचा अर्क असणार्या कॅप्सूल मिळतात, या कॅप्सूलचाही वापर करायला हरकत नाही.
लसणाचे पाच औषधी गुणधर्म !!
लिस्टिकल


१. सर्दी-खोकला-पडसे यावर हमखास इलाज म्हणजे लसूण. लसणाच्या चार पाच पाकळ्या भाजाव्यात. चमचाभर मधात कुस्करून घालाव्यात आणि गट्ट कराव्यात. सकाळ- संध्याकाळ हा उपाय करा. लसूणीत असलेले Allicin त्वरीत आराम देते. हाडे बळकट करण्यासाठी आणि हाडांची झिज थांबवण्यासाठ

२. रजोनिवृत्ती नंतर महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे स्त्रवणे कमी होते. लसूण इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढवते. परिणामी हाडांची झीज कमी होते. इतकेच नव्हे तर osteoarthritis पासून सरक्षण होते.

३. अतिश्रमाने येणारा थकवा पण नियमित लसूण सेवन केल्यास कमी होतो. हृदयाचे आकुंचन प्रसरण काबूत ठेवण्याचे कामही लसूण करते. सतत कामानिमित्त हालचाल करणार्यांना याचा विशेष फायदा होतो. उदाहरणार्थ , मॅरॅथॉनमध्ये धावणार्या लोकांना याचा फायदा होतो.

४. ब्लड प्रेशर ही एकेकाळी फक्त वयस्कर माणसांची मक्तेदारी होती. बदलत्या जीवनमानात आता ही समस्या पस्तीशीला पोहचलेल्या तरुण वर्गाचीही आहे. लसूणीत असलेले पॉलीसल्फाईड्स रक्तवाहिन्या रुंद करतात. तसेच स्नायूंनाही शिथील करतात. त्यामुळे रक्तदाब कमी होतो. अर्थात आह
रक्तात तयार होणार्या गुठळ्यांचे प्रमाण लसूणीमुळे कमी होते. लसूणीत असलेले अॅलीसीन हे रसायन यकृताला LDL cholesterol (लो डेन्सीटी कोलॅस्टोरॉल) फोडण्यात मदत करते. arteriosclerosis ची शक्यता त्यामुळे कमी होते.

५. मानवी पचनमार्गात होणारा जंतू संसर्ग आणि परोपजीवींची वाढ लसूणीमुळे खुंटते. पचन सुधारण्यास मदत करते. आतड्यात असलेले जंतांसारखे परोपजीवी लसूणीमुळे मारले जातात.
पाहा, लसूण आरोग्यासाठी किती गुणकारी आहे बरं !!
टॅग्स:
health
संबंधित लेख
लिस्टिकलHealth
वेळप्रसंगी जीव वाचवणारा सीपीआर नक्की काय असतो? तो द्यायचं तंत्र जाणून घ्या..
९ जून, २०२२
लिस्टिकलHealth
तुम्ही कसे झोपता? त्यावरून मानसशास्त्रज्ञ तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय निष्कर्ष काढतात ते ही वाचा...
७ जून, २०२२
लिस्टिकलHealth
एलॉन मस्क ते जेफ बेझोस... जगप्रसिद्ध मंडळी काय खातात?
६ जून, २०२२
लिस्टिकलHealth
'दिल की धडकन 'म्हणजे हृदयाच्या नियमित आणि अनियमित धडधडण्याविषयी सांगणार आहोत.
३१ मे, २०२२