काल संध्याकाळी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनाव्हायरसला Pandemic घोषित केलं आहे. हे Pandemic म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का?
तुम्हाला वाटेल की हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला आहे, पण खरंतर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली जेव्हा स्वाईनफ्ल्यू पसरला होता तेव्हाही WHO ने त्याला Pandemic घोषित केलं होतं. साहजिकच त्यावेळी जिओचं इंटरनेट कनेक्शन नसल्यानं आपली बरीचशी पब्लिक सोशल मिडियापासून दूर होती आणि तेव्हा त्याची फारशी चर्चा झाली नाही. आज चर्चा होतेय, खरेखोटे मेसेजेस, अफवा पसरत आहेत आणि लोकांच्या मनात बऱ्याच शंकाही येत आहेत. म्हणूनच कालपासून लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
Pandemic म्हणजे काय आणि तो केव्हा घोषित करतात, त्याचा परिणाम काय होतो?









