२१ वे शतक तंत्रज्ञानाचे आहे असे म्हटले जाते. हे किती खरे आहे हे बदलत्या जगाबरोबर रोज लक्षात येते. २० व्या शतकातील अनेक गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. तर काही गोष्टी मात्र इतक्या बदलल्या की जुन्या काळातील ही तीच वस्तू आहे का असा संशय यावा. लँडलाइन जाऊन टचस्क्रीन स्मार्टफोन आले, मोठे टिव्हीज जाऊन भिंतीवरील एलईडी स्क्रीन्स आले आहेत. आजच्या या लेखात आपण असेच काळाबरोबर बदललेल्या वस्तू बघणार आहोत.
काळाबरोबर बदलेल्या रोजच्या वापरातल्या १० वस्तू


१) वॉशिंग मशीन
वॉशिंग मशीनचा हा तेव्हाचा फोटो बघितला तर आजच्या पिढीत कुणाला हे जुन्या काळातील वॉशिंग मशीन आहे हे पटणार देखील नाही.

२) ट्रॅफिक लाईट
हा तत्कालीन ट्रॅफिक लाईटचा फोटो बघून हा ट्रॅफिक लाईट नसून एक साधा खांब आहे असे वाटू शकते, कारण तो आहेच तसा. आजचे हायटेक ट्रॅफिक लाईट बघितले तर असेच वाटेल.

३) कॉफी मेकर
जुन्या काळातील कॉफी मेकर हे एखाद्या किटलीला शोभावे असेच होते. मात्र आताच्या मशिन्स एकापेक्षा एक वेगळ्या प्रकारची कॉफी बनवू शकतात.

४) व्हॅक्युम क्लिनर
आपल्याकडे अगदी आतापर्यंत व्हॅक्युम क्लिनर झाडूसारखेच असायचे. आता मात्र वेगळे व्हॅक्युम क्लिनर आले आहेत. ज्यामुळे स्वच्छतेत पण सहजता आली आहे.

५) स्पीकर
आधीचे वेगळ्या प्रकारचे मोठे भोंगे असायचे ते आता गायब झालेले दिसतात. आता छोट्याशा स्पीकरमधून पण दमदार आवाज येताना दिसतो. हे आताच्या पिढीने पाह्यले तर आपण बाबा आदमच्या जमान्यात जगत होतो असेच त्यांना वाटेल.

६) लॅंम्प्स
जुन्या काळातील लॅंम्प्स जसे दिसायचे ते बघून हे लॅंम्प्स नसून एखादी शोभेची वस्तू आहे असेच वाटेल. कारण सध्याचे दिवे हे अतिशय सुटसुटीत, सोपे आणि दिमाखदार आहेत.

७) पेट्रोल पंप
आधीचे पेट्रोल पंप हे एखाद्या घराला साजेसे असत. बाहेर एक खांब असे, त्यातून पेट्रोल दिले जात असे. आता मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीने पेट्रोल पंप बांधले जात असतात.

८) ट्रॅक्टर्स
आधीचे ट्रॅक्टर्स हे ट्रॅक्टर नसून रोड रॉलर्स आहेत असेच आताच्या पिढीला त्यांना बघून वाटू शकते. कारण आताचे ट्रॅक्टर्स हे बऱ्यापैकी दिसण्यास चांगले आले आहेत.

९) कॅमेरा
आधी कॅमेरे एखाद्या मोठे मशीनप्रमाणे दिसत असत, त्यातून फोटो काढला जात असे. आता तर मोबाईलमध्येही फोटो घेता येतात. एवढेच काय, एखाद्या सूक्ष्म गोष्टीत पण कॅमेरा फिट करता येतो.

१०) मोबाईल
आधीचे लँडलाईन जाऊन आता मोबाईल आले आहेत. मोबाईलची पण पुढची आवृत्ती म्हणजे घड्याळात मोबाईल असणे.
जग जसजसे बदलत आहेत त्यानुसार आताचे फोटोज देखील काहीच वर्षात जुने होऊन नवे तंत्रज्ञान येऊन नव्या गोष्टी जीवनाचा भाग बनतील.
उदय पाटील