भारतीय आयुर्विमा मंडळ म्हणजे एलआयसीचा पब्लीक इश्यू (आयपीओ) येत्या नव्या वर्षात येणार आहे.हा आयपीओ किती मोठा असेल याचा नेमका आकडा अजून कोणालाच कळलेला नाही कारण महामंडळाच्या 'व्हॅल्यूएशन' चे काम अजून पूर्ण झालेले नाहीअसे असले तरी या शतकातला हा सगळ्यात मोठा आणि मौल्यवान आयपीओ असेल यात शंका नाही.ज्यांना एलआयसीचे समभाग मिळतील ते भारतातले सगळ्यात नशिबवान लोकं समजले जाणार आहेत.नशिबवान होणं हा दैवाचा भाग असला तरी नशिबवान होण्याची संधी प्रत्येकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मिळतच असते.सरकारने नुकतेच एलआयसी अॅक्ट -१९५६ या कायद्यात बदल केले आहेत. या बदलानुसार आयपीओचा १०% हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवण्याची परवानगी एलआयसीला मिळाली आहे. त्यामुळे एलआयसीचे अनेक पॉलिसीधारक 'भाग्यवान' ठरणार आहेत.जर तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर ही सुवर्णसंधी हातातून घालवू नका. ही संधी काबिज करण्यासाठी नेमके काय करायचे आहे हे आता समजून घ्या.
एलआयसीच्या पब्लीक इश्यूचा पॉलिसीधारकांसाठी राखीव १०% कोट्याचा अर्ज भरण्यापूर्वी काय कराल ??


जर तुम्ही : १) एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि २) तुमचे डिमॅट खाते तयार असेल तरच तुम्ही या राखीव कोट्यात अर्ज करू शकाल.
तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर तुमची पॅन कार्ड आणि वैयक्तिक माहिती एलआयसीकडे अपडेट केलेली असली पाहीजे.आपल्यापैकी बहुतेकांनी पॅन कार्ड आणि इतर माहिती पॉलिसी घेतान दिलेलीच असते पण तरीही एकदा चेक करून घेण्यासाठी
१ - https://www.licindia.in या एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.या संकेतस्थळाच्या मेनूवर 'ऑनलाइन चेकींग पॉलिसी पॅन स्टेटस' वर क्लिक करा.तुमच्यासमोर एक नवा फॉर्म दिसेल , त्यात आवश्यक माहिती भरा.पॅन जोडलेले असेल तर तसे त्यात दाखवले जाईल.

जर तुमच्या पॅन कार्डचे डिटेल्स अजून अपडेट केले नसतील तर त्याच संकेतस्थळावर ऑनलाईन पॅन रजीस्ट्रेशनचा पर्याय आहे त्यावर क्लिक करा.
१ तुमचे पूर्ण नाव /जन्म तारीख/ लिंग/इमेलआयडी/मोबाइल नंबर/ पॉलिसी नंबर इत्यादी माहितीची नोंद करा.
२ त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून बाकीची माहिती पूर्ण करा.
हे झाले की तुमच्या कामाचा भाग -१ पूर्ण झाला.

आता भाग दोन म्हणजे डिमॅट अकाउंट.ज्यांचे डिमॅट अकाउंट तयार असेल त्यांना नवे खाते उघडण्याची गरज नाही पण ज्यांच्याकडे डिमॅट खाते नसेल त्यांनी एनएसडीएल किंवा सिडीएसएलच्या संकेतस्थळाला भेट देऊन डिमॅट खाते उघडण्याची माहिती घ्यायची आहे. डिमॅट खाते तुमच्या जवळच्या/ओळखीच्या अधिकृत ब्रोकरकडे म्हणजे डिपॉझिटरी पार्टीसीपंटच्या माध्यमातून उघडता येते.त्याखेरीक बँकापण ही सुविधा देतात.
अधिक माहितीसाठी https://nsdl.co.in/joining/invest.php किंवा https://ww1.cdslindia.com/investors/open-demat.aspx या लिंकचा वापर करावा.

या दोन्ही अटी पूर्ण झाल्या की तुम्ही पॉलिसीधारकांच्या राखीव कोट्यात अर्ज करायला मोकळे झालात !
आता काही महत्वाच्या सूचना :
१ )पॉलिसीधारक आहात याचा अर्थ समभाग मिळतीलच याची खात्री नाही पण राखीव कोट्यातून समभागाचा अर्ज करण्यासाठी ही खटपट करायची आहे.
२) समभाग खात्रीने मिळवून देतो अशी लालूच दाखवणार्या एजंटापासून सावध राहावे.
३) अर्ज करताना तुमची पॉलिसी 'चालू' असली पाहिजे. बंद पडलेल्या पॉलिसीच्या धारकांना ही संधी मिळेलच याची खात्री नाही.
अर्थात तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्य्मातून विचारायला हरकत नाही.