दक्षिण भारतातले प्रसिद्ध फोटोग्राफर जी वेंकट राम यांनी २०२० सालच्या कॅलेंडरचं अनावरण केलं आहे. या कॅलेंडरसाठी त्यांनी आगळावेगळा प्रयोग केलाय. त्यांनी राजा रविवर्मा यांच्या चित्रांना नव्याने जिवंत केलंय. यासाठी त्यानी दक्षिण भारतातल्या सिनेक्षेत्र आणि नृत्यक्षेत्रातल्या ११ प्रसिद्ध अभिनेत्रींची निवड केली आहे.
श्रुती हसन, रम्या कृष्णा, समंथा रूथ प्रभू, ऐश्वर्या राजेश, नादिया, खुशबू सुंदर, इत्यादी अभिनेत्रींनी राजा रविवर्मा यांच्या प्रसिद्ध चित्रांतील पात्रं साकारली आहेत. चित्रांसाठी चेहरा निवडताना खास काळजी घेण्यात आली आहे हे बघितल्यावर लगेच समजून येतं. एक मात्र आहे की राजा रविवर्मा यांनी चितारलेली स्त्री ही जास्त अस्सल वाटते. दुसऱ्या बाजूला आताचे चेहरे हे अधिक नाटकी वाटतात.












