कोणतं मेसेजिंग अॅप सुरक्षित आहे? उत्तर कोणाकडेच नाही. फेसबुक पाठोपाठ व्हॉट्सअॅपही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय. १२० भारतीयांच्या व्हॉट्सअॅपवर अज्ञातांनी हल्ला केल्याची बातमी नुकतीच आली होती. सर्वसामान्य माणसांचं तर सोडा पण अमेझॉनचे मालक आणि जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमधले एक जेफ बेझॉस यांचा मोबाईल काही दिवसापूर्वीच हॅक झाला होता. जेफ बेझॉस सारख्या मोठ्या व्यक्तीचा मोबाईल जर हॅक होऊ शकतो तर आपल्या सर्व सामान्य माणसाचं काय?
तर, इतर मेसेजिंग अॅप्सचं जाउद्या पण व्हॉट्सअॅप संरक्षण आता शक्य आहे. कसं ते आजच्या लेखात जाऊन घेऊया.








