पुणेकरांकडे जर मिसळ असेल तर आमच्याकडे आमचा हक्काचा वडापाव आहे असं छातीठोकपणे मुंबईकर म्हणतो. कारण वडापाव म्हणजे प्रत्येक मुंबईकाराचा जीव की प्राण आहे. मंडळी, आम्ही तुम्हाला वडापावचा शोध कसा लागला याबद्दल '...असा झाला वडापावचा जन्म !!' या लेखात माहिती दिली होती. आपला या लाडक्या वडापावचा जन्म दादर मध्ये झाला असला तरी संपूर्ण मुंबईने त्याला उचलून धरलं आहे. मंडळी, नुकतंच आपल्या 'वडापावच्या नावाने 'पोस्टल स्टॅम्प' जारी करण्यात आले आहेत. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

तर मंडळी, आज आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईतली वडापावसाठी फेमस असलेली दहा ठिकाणं !!
चला तर वाट कसली बघताय...या लिस्टकडे एकदा नजर टाकूया !!
