साडी हा अगदी सगळ्या स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. हातमागावर विणलेल्या, सिल्क, कशिदाकारी केलेल्या, तर कधी प्लेन, काठपदराच्या, डिझाईनच्या, प्रिंटेड.. कितीतरी प्रकारच्या साड्या आणि व्हरायटी असते. पण मग रोज काही या साड्या वापरल्या जात नाहीत, त्यांच्यासोबत इतक्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात, की त्या टाकवत किंवा कुणाला देऊन टाकाव्याशा वाटत नाहीत.. आणि नुसती कपाटातली जागा अडवली जाते.
यावर एक मस्त उपाय आहे.. एक चांगला शिंपी शोधायचा आणि त्या साड्यांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस शिवून घ्यायचे. आजकाल इंडोवेस्टर्न, फ्युजन या नावाखाली अशा कपड्यांच्या फॅशनची चलती आहेच.. हे ड्रेसेस शिवताना तुम्ही तुमची कल्पकता दाखवून "रंग माझा वेगळा" हे सिद्ध करू शकताच.. तुम्हांला याकामी मदत म्हणून बोभाटाची टीमही अशा काही कल्पना घेऊन आलीय.
या आधी आम्ही अशा आठ आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्या होत्याच, त्यात ही आणखी २५ प्रकारांची भर. काय म्हणता?
चला तर मग, शिंपी शोधण्याआधी कोणत्या साडीचं नक्की काय करायचं हे ठरवूयात..

























