सौंदर्याची व्याख्या प्रत्येक काळानुसार बदलत गेली आहे. खास करून स्त्रियांबदल असणारे सौंदर्याचे मापदंड अनेकदा बदलत गेलेत. तसेच सौंदर्यात भर घालण्यासाठी करावयाच्या उपायांमध्येही बदल होत गेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर जपानमध्ये काळे दात हे सौंदर्यचं प्रतिक समजले जायचे. या उलट एक काळ असा होता जेव्हा इंग्लंडमध्ये खराब दात श्रीमंत असण्याचं लक्षण मानले जायचे. याखेरीज ओठांना लाली यावी म्हणून कीटकांपासून तयार करण्यात आलेला लाल रंग वापरला जात असे.
अशा एक ना अनेक पद्धतीने सौंदर्याचा अर्थच अनेक वर्षांमध्ये बदलत गेला आहे. काळात झालले हे बदल सगळेच्या सगळे तुमच्या समोर मांडता येणार नाही म्हणून आम्ही काही निवडक उदाहरणं घेऊन आलो आहोत. चला तर आजच्या लेखातून स्त्रियांच्या सौंदर्याचा एक इतिहासच नजरेसमोरून घालूया.












