आयुष्यात लग्न एकदाच होते, त्यामुळे लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. नवरा नवरीला तर लग्नातल्या प्रत्येक क्षणाचे खूप महत्व असते. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे ते बारकाईने पाहतात. तो एक दिवस ते राजा राणी सारखे असतात. त्यामुळे मेकअप, पेहराव हे खूप महत्वाचे असतात. प्रत्येक विधीला वेगवेगळे नवीन पेहराव हे तर आलेच. अगदी बॉलीवूड कलाकारांच्याही लग्नात त्यांनी काय स्टाईलचे कपडे परिधान केले आहेत याचे सर्वसामान्यांना विशेष कुतूहल असते. पण ही बातमी आहे अश्या नवरदेवाची ज्याने स्वतःच्या लग्नात फक्त एक हाफचड्डी घातली आहे. हो! खरंय हे. त्यांचे फोटो इतके व्हायरल झालेत की नेटकरी फोटो पाहून गोंधळात पडले आहेत. तुम्हीही फोटो पाहूनच घ्या.
samawa pic.twitter.com/GkIiOU6Fqr
— curtiz (@br0wski) April 2, 2021
इंडोनेशिया मधील जावा भागात ही नवतरुण जोडी आहे. या फोटोत तुम्हाला सुंदर नवरी दिसत आहे. ती केसांपासून पायापर्यंत नखशिखांत सजली आहे. आणि शेजारी नवरदेव फक्त चड्डीवर माळ घालून बसले आहेत. हाताला पायाला जखमा दिसत आहेत. हा फोटो एक ट्विटर यूजरने पोस्ट केला आणि बघताबघता तो सगळीकडे शेयर झाला. जवळजवळ १५००० च्या वर त्याला लाईक आले. त्यावर अनेक गंमतीदार कमेंट्स ही आल्या. पण सर्वाना हे जाणून घ्यायचे होते की नवरदेवाला नक्की झाले काय? त्याला जबरदस्तीने तर लग्नाला नाही बसवले ना? याला अपघाती लग्न म्हणावे का?





