फक्त रु. १७०००००००००० चा करार !!!

फक्त रु. १७०००००००००० चा करार !!!

करार कोणामध्ये ? भारत आणि इस्राईलमध्ये!

कशासाठी ? जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे (medium-range surface-to-air missile) तयार करण्यासाठी!

 

भारत आणि इस्राईलदरम्यान १७००० कोटी रुपयांचा मिडीयम रेंजची जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे (medium-range surface-to-air missile) तयार करण्याबाबतचा करार झाला आहे आणि भारतातली ‘डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ) आणि इस्राईलच्या ‘इस्राईल ऐअरक्राफ्ट इंडस्ट्री’ (आय.ए.आय.) या दोन्ही संस्था हा प्रकल्प एकत्रितरीत्या राबवणार आहेत. या कराराअंतर्गत ४० फायरिंग युनिट आणि २०० क्षेपणास्त्रे तयार करण्यात येणार आहेत आणि त्यांची किंमत १७००० कोटी असेल.

सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २२ फेब्रुवारीला बैठक झाली आणि या क्षेपणास्त्र कराराला संमती मिळाली. २०१७ मध्ये दोन्ही देशातील राजनैतिक संबंधाची २५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून करारावर सही करण्यासाठी नरेंद्र मोदी लवकरच इस्राईल दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

MR-SAM (medium-range surface-to-air missile) ही लांब पल्ल्याच्या आणि जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची आवृत्ती आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ५० ते ७० किलोमीटरपर्यंत असेल. विशेष बाब म्हणजे ही क्षेपणास्त्रे भारतातच तयार केली जाणार आहेत. यात भारताचा वाटा 80% असून २०२३ पर्यंतचा कालावधी डीआरडीओला देण्यात आलाय.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इंस्टीट्यूटच्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात भारत हा जगातला सर्वाधिक शस्त्रे आयात करणारा देश बनला आहे. एकूण जागतिक शस्त्रास्त्रे विक्रीतील १३% भाग भारत विकत घेतो.

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख