उंच दिसण्याचे ४ साधे-सोपे-सुटसुटीत उपाय

लिस्टिकल
उंच दिसण्याचे  ४ साधे-सोपे-सुटसुटीत उपाय

नैसर्गिक उंची एखाद्याला नसली म्हणून काय झालं?  कधी-कधी  कपड्यांची स्टाईल  आणि उभं राहण्याची पद्धत यावरूनही उंची कमी-अधिक दिसू शकते. म्हणजेच, चुकीच्या पद्धतीमुळे उंच माणूसही बुटका दिसू शकते. याचाच अर्थ असा, या टिप्स जशा कमी उंचीच्या लोकांसाठी उपयुक्त आहेत, तशाच त्या उंच लोकांनाही नक्कीच उपयोगी पडतील. 

१. ताठ उभं राहा

१. ताठ उभं राहा

सुशांत सिंग राजपूतची उंची चांगली पाच फूट दहा इंच आहे. पण पहिल्या फोटोत तो बराचसा बुटका वाटतो, तर दुसर्‍या फोटोत अगदी कॉन्फिडंट आणि उंच!! आता तुम्हीच पाहा म्हणजे झालं. 

२. कपड्यांची  डिव्हाईडर लाईन टाळा

२. कपड्यांची डिव्हाईडर लाईन टाळा

उंची कमी असण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. कुणाच्या पायांची लांबी कमी असते तर कुणाच्या धडाची. ही धड आणि पाय यांची विभागणी दाखवणारी रेषा दाखवली नाही, तर माणसाची उंची अधिक वाटते. हे साधायचं कसं?

हे करा:

१. एकाच रंगछटेचे सगळे कपडे घालायचे. पहिला मार्टिन फ्रीमनचा किंवा शेवटचा सुशांत सिंगचा फोटो पाहा. मार्टिन आहे ५’६" उंचीचा. पण एकाच कापडातल्या सूटमुळे त्याची उंची अधिक वाटतेय. सुशांतने अगदी एकच रंग वापरला नसला, तरी साधारण एकच छटेचे कपडे घातले आहेत.

हे टाळा:

१.  कमरेच्या ठिकाणी  काळ्या रंगाचे कपडे जाडी लपवतात, पण म्हणून पूर्ण काळेच कपडे घातले, तर ते उंचीही कमी दाखवतात. त्यामुळे  ’मेन इन ब्लॅक’ लूक अगदी नो नो!

२. बेल्टस... एकतर घालूच नका कारण ते सरळ-सरळ शरीर वरच्या आणि खालच्या भागात विभागतात. पाहा बरं, सुशांतचा पूर्ण निळ्या रंगातला पण पांढर्‍या बेल्टचा फोटो. किंवा मग घालायचाच, तर तो ट्राऊझरच्या रंगछटेचा घाला.

३. शर्टाची लांबी

३. शर्टाची लांबी

शर्टाची योग्य लांबीमुळेही पायाची लांबी कमी किंवा अधिक वाटते. त्यामुळे शर्टाची लांबीही ड्रेसिंग स्टाईलमध्ये तितकीच महत्वाची आहे.

४. पॅंटची लांबी योग्य ठेवा.

४. पॅंटची लांबी योग्य ठेवा.

पॅंटची लांबी योग्य नसणं हे ही बुटकं दिसण्याचं एक कारण आहे. पॅंट घातल्यानंतर घोट्याजवळ सळ पडायला नको. म्हणजेच ’नो ब्रेक’ असलेली ट्राऊझर घालणं हे योग्य. रेडिमेड कपडे घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम जरा जास्त येतो. खरंतर रेडिमेड कपडे नाही, तर त्या कपड्यांचं अल्ट्रेशन करून न घेण्याचा आळस हे बुटकं दिसण्याचं मुख्य कारण आहे. फक्त पॅंट्समधले ब्रेक्स सोबतच दुमडलेल्या जीन्स हे एक वाईट प्रकरण आहे. लांब होणारी जीन्स दुमडली की ती घालणारेसुद्धा बुटके दिसतात.

 

 

स्त्रोत