सातत्य आणि चिकाटी याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण ४६ वेळा दहावी नापास होऊनसुद्धा ४७ व्या वेळी परिक्षा देऊन पुन्हा नापास होण्याची गोष्टच निराळी आहे. असे करणारे महाशय आहेत ८१ वर्षीय शिवचरण यादव. राजस्थानमध्ये राहणारे शिवचरण गेल्या ४७ वेळा दहावी नापास झाले आहेत पण तरीही त्यांनी परिक्षा देणं काही सोडलेलं नाही. दहावी पास झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्धार असल्याने ते अद्याप अविवाहित आहेत. सध्या ते एका मंदिरात राहत असून त्यांचा सर्व खर्च सरकारच्या पेन्शनवर भागत आहे.
१९६९ साली शिवचरण यांनी पहिल्यांदा दहावीची परिक्षा दिली होती. १९९५ मध्ये दिलेल्या परीक्षेत शिवचरण गणित विषय सोडून सर्व विषयात पास झाले होते. पण या वर्षीच्या परिक्षेत ते बर्याच विषयात शून्य मार्कांनी नापास झाले आहेत. अर्थात याला कारणीभूत त्यांचं वाढतं वयोमान आणि अधू दृष्टी आहे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत परिक्षा देत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. लग्नाचं वय तर गेलं पण परीक्षा देत राहून नवीन रेकोर्ड करणार असल्याचं शिवचरण यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
