पृथ्वी शॉ या नवोदीत खेळाडूने आपला करिष्मा दाखवत एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार मारून नवीन विक्रम केला. पृथ्वी शॉ पुढचा सचिन म्हणून ओळखला जातो. गेले काही दिवस त्याच्यावर बरीच टीका झाली पण शेवटी त्याने सर्वांना दखल घ्यायला मात्र भाग पाडले.
एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारे जसे अनेक खेळाडू आहेत तसेच एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार मारणारे देखील आहेत. सलग चौकार मारणे हे सलग षटकार मारण्यापेक्षा कठीण समजले जाते. पृथ्वी शॉ हा सलग ६ चौकार मारणारा पहिला नाही, त्याआधी देखील अनेकांनी हा विक्रम केला आहे. अशाच ५ बॅट्समनबद्दल आज आपण जाणून घेऊया.









