आपल्या आवडत्या क्रिकेटर्सचे इतर यशस्वी उद्योग माहित आहेत का?

लिस्टिकल
आपल्या आवडत्या क्रिकेटर्सचे इतर यशस्वी उद्योग माहित आहेत का?

क्रिकेटर्सचे करियर १०-१५ वर्षांचं असतं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मग हे खेळाडू क्रिकेटशी संबंधित काही गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ कॉमेंट्री, कोच इत्यादी करतात. पण आजकाल बरेचजण क्रिकेटसोबत पैशांची चांगली गुंतवणूक करून उत्तम पोस्ट रिटायरमेंट प्लॅन तयार करून ठेवतात. आज अशाच काही क्रिकेटर्स आणि त्यांच्या बिझनेस डोकॅलिटीची आपण माहिती घेणार आहोत.

1) विराट कोहली

1) विराट कोहली

आजच्या घडीला भारतच नाही, तर जगात सर्वात लोकप्रिय क्रिकेटर कुणी असेल तर तो म्हणजे विराट कोहली!! आपल्या लोकप्रियतेला कसे कॅश करून घ्यायचे हे त्याला चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्याने एवढ्या कमी वयात ३८२ कोटींची संपत्ती जमवली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. क्रिकेट आणि जाहिरातींव्यतिरिक्त त्याचे काही व्यवसाय आहेत. या व्यवसायांच्या माध्यमातून तो कोट्यावधी कमवत असतो. कोहलीने सुरू केलेली चिसेल नावाच्या जीम्सची चेन भारतभरात पसरत आहे. स्टेपथलोन किड्स नावाच्या एका स्टार्टअपमध्येदेखील त्याची गुंतवणूक आहे. सोबतच त्याचा WROGN नावाचा इ-कॉमर्स फॅशन ब्रँड आहे.

2) एम. एस. धोनी

2) एम. एस. धोनी

माहीचं चेन्नई प्रेम फक्त आयपीएल टीमपुरतं मर्यादित नाहीये. चेन्नईमधल्या अनेक व्यवसायांमध्ये तो भागीदार आहे. चेन्नईत एक रन ऍडम नावाचे स्पोर्ट्स टेक स्टार्टअप आहे, त्याचे 25 टक्के शेयर्स आपल्या थलाईवाकडे आहेत. चेन्नईमधीलच फुटबॉल टीम चेन्नई FC चा तो सहमालक आहे. सेव्हन नावाचा लाइफस्टाइल ब्रँडचा अर्धा मालकी हिस्सा देखील कॅप्टन कूलकडे आहे. या सर्वांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या स्टार्टअप्समध्ये त्याने गुंतवणूक केली आहे.

3) युवराज सिंग

3) युवराज सिंग

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून आल्यावर युवीने युवीकॅन नावाचा फॅशन ब्रँड सुरू केला. या ब्रँडच्या माध्यमातून तो कॅन्सर पीडितांनादेखील मदत करत असतो. सोबतच त्याने sports365 नावाची स्पोर्ट्स साहित्य पुरवणारी इ-कॉमर्स कंपनी देखील सुरू केली आहे. त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात vyomo, moovo, black with orange, cartisan, heathiens, educart आणि sportybeans या कंपन्यांचा समावेश आहे. फाईनऍपनुसार त्याच्याकडे १६४ कोटींची संपत्ती आहे.

4) सचिन तेंडुलकर

4) सचिन तेंडुलकर

आपला हा मराठमोळा गडी क्रिकेटमध्ये जसा विक्रमादित्य आहे, तसा व्यवसायातदेखील चांगलाच हुशार आहे. रिटायरमेंटनंतर देखील त्याचा करिष्मा कमी झाला नाहीये. सचिनने अनेक ब्रँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. अनेकांना माहीत नाही, पण सचिन स्मार्टरॉन नावाच्या टेक्नॉलॉजी कंपनीचा मुख्य गुंतवणूकदार आहे. अनेक रेस्टॉरंट्सचा तो मालक आहे. मुसाफिर आणि स्मॅश इंटरटेंनमेंटमध्येदेखील त्याची गुंतवणूक आहे. केरला ब्लास्टरर्स FC चा तो सहमालक आहे. S drive आणि sach कंपनीत त्याचे शेअर्स आहेत.

5) वीरेंद्र सेहवाग

5) वीरेंद्र सेहवाग

वीरु मैदानात उतरला म्हणजे कित्येकदा धावांचा पाऊस पाडायचा. पैसे कमवण्याच्या बाबतीतसुद्धा तो तसाच आहे. सध्या ट्विटरवर तो चांगलाच ऍक्टिव्ह असला तरी पैसे कमवण्यावर त्याचे दुर्लक्ष झालेले नाही. दिल्लीत त्याचे 'सेहवाग्ज फेव्हरेट' नावाचे रेस्टॉरंट आहे. तसेच हरियाणात सेहवाग इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याचा त्याचा मानस आहे.

 

वयाच्या साठीपर्यंत जरी हे लोक काम करत नसले तरी पैसा आहे तोवर केलेली ही गुंतवणूक त्यांच्या नक्कीच कामी येईल.

टॅग्स:

sachin tendulkarcricketdhoni

संबंधित लेख