मंडळी ‘क्युरीयस केस ऑफ बेन्जामिन बटन’ या नावाचा इंग्रजी सिनेमा जर तुम्ही बघितलाय तर तुम्हाला आठवत असेल की त्यात त्या नायकाचा जन्म एक वृद्ध म्हणून होतो आणि मृत्यू एका लहान बाळा सारखा होतो. तो म्हातारपणातून हळू हळू तरुण होत जातो. आता ती एक सिनेमाची कथा आहे मंडळी. तसं काही रियाल लाईफ मध्ये घडणे तर शक्यचं नाही. पण एका माणसाला बघून तुम्ही म्हणाल की हे खरचं शक्य आहे.


भेटा सिंगापूर ‘च्युअॅन दो टॅन’ या तरुणाला. हा ‘तरुण’ फोटोग्राफर असून फोटोत दिसल्या प्रमाणे हा साधारण तिशीतला वाटतो परंतु याचं खरं वय बघून तुम्ही चक्राऊन जाल. याचं वय चक्क ५० वर्ष आहे. खोटं वाटतंय ना ? आमचं पण सेम झालं होतं. पण राव हे खरं आहे की याने पन्नाशी ओलांडली आहे.
आता तुम्ही विचारलं 'हा कोणती जडीबुटी खातो ब्वा ?' तर भाऊ चांगला व्यायाम आणि योग्य आहार हेच याच्या मागचं सिक्रेट आहे. नियमित व्यायामामुळे तो स्वतःला ‘मेन्टेन’ ठेवण्यात यशस्वी झालाय. त्याला बघून कोणीही म्हणेल की हा तर २५-३० वर्षांचा ‘बांका नौजवान’ आहे.

टॅन हा एकेकाळी सिंगापूरचा एक प्रसिद्ध मॉडेल होता, आता तो फोटोग्राफरचं काम करतोय. ChuanDo & Frey नावाची त्याची एजन्सी देखील आहे. इन्स्टाग्राम वर टॅनचे तब्बल ३ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत आणि यात महिलांची संख्या जास्त आहे हे काही वेगळं सांगायला नको.

राव पन्नाशीतली माणसं एवढी हँडसम दिसायला लागल्यावर आमच्या सारख्या तरुणांनी कुठे जायचं ब्वा ? असा एक नवीन प्रश्न आमच्या डोक्यात आला. असो...
(सर्व फोटो स्रोत)
