आज पाण्याचा साठा करण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. पूर्वी अशी साधनं नव्हती, म्हणून विहीर अत्यंत महत्त्वाची होती. जवळपास नदी किंवा अन्य नैसर्गिक स्रोत नसल्यास पाण्याचा जो काही स्रोत असायचा तो म्हणजे विहीर. भारतात या विहिरींना कालांतराने वेगळं स्वरूप मिळालं. विशेषतः गुजरात आणि राजस्थान सारख्या पाण्याचा अभाव असलेल्या भागात विहिरी आणि स्थापत्यकला यांचा सुंदर मिलाफ बघायला मिळतो. अनेक पायऱ्या, शिल्पांनी सजवलेल्या भिंती आणि कुशलतेने केलेलं कोरीवकाम असं विहिरींना स्वरूप मिळालं. आता ही भारतातली एक महत्त्वाची ऐतिहासिक ठेव बनली आहे. गुजरातच्या ‘राणी की बांव’ विहिरीला तर युनिस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिलं आहे.
आजच्या लेखात आपण भारतातल्या ८ महत्त्वाच्या पायऱ्यांच्या विहिरींची ओळख करून घेणार आहोत.













