अफगाण पित्याने स्वतःचे मुल अमेरिकन सैनिकांना का सोपवले? हा हृदयद्रावक व्हिडीओ काय सांगतो?

अफगाण पित्याने स्वतःचे मुल अमेरिकन सैनिकांना का सोपवले? हा हृदयद्रावक व्हिडीओ काय सांगतो?

अफगाणिस्तानवर जेव्हापासून तालिबानचे राज्य आले तेव्हापासून तालिबान्यांपासून सुटकेसाठी तेथील लोकांचे सुरू असलेले प्रयत्न रोजच्या रोज पाहायला मिळत आहेत. विमानात गर्दी करून बसलेले तसेच विमानाला लटकलेले अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. यातून तालिबान पासून दूर जाण्यासाठी तेथील लोक किती प्रयत्न करत आहेत हेच दिसते. 

सध्या असाच एक व्हिडिओ लोकांचा हृदय पिळवटून टाकत आहे. काबुल एयरपोर्टवर अमेरिकन सैन्याकडून लोकांना बाहेर काढले जात आहे. अशावेळी एक बाप आपले लहान मुल सुरक्षित राहावे म्हणून ते अमेरिकन सैन्याकडे सोपवत असतानाचा हा व्हिडिओ आहे. 

या व्हिडिओत अमेरिकन अधिकारी ते मुल स्वतःकडे घेऊन नंतर आपल्या सहकाऱ्याकडे सोपवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अफगाणिस्तान येथील लोक किती जीवावर उदार होऊन तेथून निसटू पाहत आहेत हे समोर येते.

काबुल एयरपोर्टवर चित्रित करण्यात आलेला हा व्हिडीओ बघून जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपले मुल अशा पद्धतीने सोडावे लागणे यावर हळहळ व्यक्त होत आहे.