काही दिवसांपूर्वीच "फॉग चल राहा है।" हा आमचा लेख वाचला असेलच. आज फॉगच्या एका नव्या जाहिरातीबद्दल आधी वाचूया!
या जाहिरातीचा विषय आहे आपल्यावर आलेले कोरोनाचे संकट. म्हणजे विषय तसा नवा नाही पण मग ही व्हिडीओ अॅड का बघायची हा प्रश्न आहेच. तर,जुनाच विषय नव्याने सादर करण्याच्या शैलीचा अनुभव घेण्यासाठी हा व्हिडीओ बघायचा. 'हत्ती गेला आणि शेपूट राहिलं' या जुन्या वाक्प्रचारावर आधारीत या जाहिरातीची मध्यवर्ती कल्पना आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. लसीकरण चालू आहे, मृत्यूंचे प्रमाण घटते आहे. म्हणजे हत्ती गेलाच आहे असा आशावाद या जाहिरातीत दिसतो आहे..... पण शेपूट अजूनही बाकी आहे अशी सावधगिरीची सूचना पण सोबत दिली आहे.






