कार, मोटरसायकल किंवा स्कूटर घ्यायचे म्हटले तरी मध्यमवर्गीय माणूस हजारवेळा विचार करतो.लोकं मोठ्या हौशीने, खर्च करून, कर्ज काढून गाड्या घेतात..बर्याचवेळाअसेही होते की गाडीच्या जाहिरातीत जे दावे केले जातात ते फोल ठरतात. कंपनीजवळ तक्रार कर, किंवा सोशल मीडियावर याबद्दल लिही असेही काही उपाय असतात पण ते करूनही कंपनी दखल घेत नाही हे कळल्यावर माणूस वैतागतोच .काही वल्ली मात्र लय डोक्यावरचे असतात.पदरात आलेले नैराश्य व्यक्त करण्यासाठी लोकं मग गाडीची वरात गाढवासोबत काढतात.फोर्ड टोयोटा,एमजी या सगळ्या गाड्यांची आतापर्यंत गाढव वरात निघालेली आहे. आता नंबर लागलाय ओला स्कूटरचा ! .
आता आपल्या बीडमध्येही असाच किस्सा झाला आहे. सचिन गीते यांनी ओलाची ई- स्कूटर घेतली. सध्या ई- वाहनांचा जमाना आहे म्हणून त्यांनी ही गाडी तर घेतली. पण ही गाडी काही व्यवस्थित वाटत नव्हती. गाडीच्या तक्रारी आल्या. मग त्यांनी पहिला प्रयत्न केला तो ओलाच्या कस्टमर सर्व्हिसशी संपर्क केला.

