सिनेमे बघता ना? मग सांगा बरं या प्रमाणपत्रांबद्दल तुम्हांला कितपत माहिती आहे??

लिस्टिकल
सिनेमे बघता ना? मग  सांगा बरं या प्रमाणपत्रांबद्दल तुम्हांला कितपत माहिती आहे??

चित्रपट पाहताना सुरूवातीला दाखवलं जाणारं ते किचकट सर्टिफिकेट आपण पाहतो आणि सोडून देतो. पण ते कशासाठी असतं? त्यात काय लिहिलेलं असतं? आजच्या तरूण पिढीला कधी ते तितकंसं जाणून घ्यावंसं वाटत नसेल.. पण तुमच्या आई-बाबांना विचारा. ते सर्टिफिकेट आलं की सगळ्यात आधी एकच प्रश्न असायचा, " किती रीळांचा सिनेमा आहे?". त्यावरून तो किती वेळ चालणार आहे हे कळायचं ना.. आता काय, सरळ मिनिटंच लिहितात. सगळी मजा गेली राव.. 

तर असो.. या सर्टिफिकेटांचे किती प्रकार असतात आणि त्यांचे अर्थ काय असतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण कधी केलाय का?  नाही? चला तर मग.. आज त्याबद्दल थोडी माहिती घेऊयात... 

भारतात एखाद्या चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड, म्हणजेच "सेंट्रल बोर्ड अॉफ फिल्म सर्टिफिकेशन" या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करावं लागतं. आणि हे प्रमाणपत्र मिळणं किती अवघड आहे हे तुम्हांला आजकालच्या उदाहरणांवरून कळलं असेलच. ’उडता पंजाब’, नुकताच चर्चेत आलेला ’लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि अनुराग कश्यपचे ’ब्लॅक फ्रायडे’ आणि ’पांच’ सगळ्यांना हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किती झगडावं लागलं. यातल्या काही पिक्चरना सर्टिफिकेट मिळालं, काहींना कधीच मिळालं नाही आणि काही सिनेमांचं पुढं काय होईल, ते एक सेन्सॉर बोर्डच जाणे.

असो.. चित्रपटांच्या स्वरूपावरून त्यांना मिळणारी प्रमाणपत्रे ही वेगवेगळी असतात आणि हे सर्टिफिकेट चित्रपटाच्या सुरुवातीला दहा सेकंद दाखवणं बंधनकारक आहे. तर मग आता बघूया या प्रमाणपत्रांचा अर्थ आणि स्वरूप काय आहे... 

प्रमाणपत्रावर फक्त 'अ' असेल तर हा चित्रपट कोणीही पाहू शकतो.

प्रमाणपत्रावर फक्त 'अ' असेल तर हा चित्रपट कोणीही पाहू शकतो.

प्रमाणपत्रावर 'अव' लिहीलेलं असेल तर हा चित्रपट १२ वर्षाखालील मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहावा असा संकेत आहे..

प्रमाणपत्रावर 'अव' लिहीलेलं असेल तर हा चित्रपट १२ वर्षाखालील मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहावा असा संकेत आहे..

ज्या प्रमाणपत्रावर फक्त 'व' लिहीलेलं आहे असा चित्रपट फक्त १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असतो.

ज्या प्रमाणपत्रावर फक्त 'व' लिहीलेलं आहे असा चित्रपट फक्त १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असतो.

प्रमाणपत्रावर 'S' लिहिलेलं असेल तर हा चित्रपट स्पेशल प्रेक्षकांसाठी असतो. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञांसाठी...

प्रमाणपत्रावर 'S' लिहिलेलं असेल तर हा चित्रपट स्पेशल प्रेक्षकांसाठी असतो. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञांसाठी...

या जागी सेन्सॉर बोर्डाच्या निरीक्षकांची नावे असतात..

या जागी सेन्सॉर बोर्डाच्या निरीक्षकांची नावे असतात..

या ठिकाणी अर्जदार आणि निर्मात्याचं नाव असतं.

या ठिकाणी अर्जदार आणि निर्मात्याचं नाव असतं.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील दृष्यांना कात्री लावली असेल तर प्रमाणत्रावर हा त्रिकोण असतो.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील दृष्यांना कात्री लावली असेल तर प्रमाणत्रावर हा त्रिकोण असतो.

या जागी चित्रपटाचा कालावधी आणी रीळ यांची माहिती असते...

या जागी चित्रपटाचा कालावधी आणी रीळ यांची माहिती असते...

अरे व्वा.. आता तर तुम्ही सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट वाचण्यात एकदम एक्सपर्ट झालात. मग  काय, पुढच्या वेळेस सिनेमा बघताना लगेच त्याचं प्रमाणपत्र नीट वाचणार ना?