का बरं, "मेरे हजबंड मुझको पियार नहीं करते"?

का बरं, "मेरे हजबंड मुझको पियार नहीं करते"?

‘दि कपिल शर्मा शो’ मधली रिंकू भाभी माहीतच असेल तुम्हाला. आता माहित नसायला काय झालं? ‘हमारा जिंदगी बरबाद हो गया’ आणि ‘हमारे हसबंड हमको प्यार नही करते’ अशी व्यथा मांडणाऱ्या रिंकू भाभीला बघून अनेकांचे डोळे डबडबतात. जणू ती अखिल भारतीय पती पीडीत महिलांचं नेतृत्वच करते. याच रिंकू भाभीचं एक मजेशीर गाण सध्या व्हायरल झाल आहे.. यात ती आपली तीच व्यथा नव्याने सांगत आहे पण गाण्यामधून.

‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू भाभी’ हे पात्र साकारणाऱ्या सुनील ग्रोवरने त्याच्या फॅन्ससाठी एक मस्त ट्रीट देण्याचं ठरवलेलं दिसतंय. तुम्हाला जर सुनील ग्रोवरचं काम आवडत असेल तर हे गाणं सुद्धा नक्कीच आवडेल.

एकदा बघाच बिचारी काय सांगू पाहतेय ते !!!