जगभरात दक्षिण अमेरिकन महिला चित्रकार 'फ्रिडा काहलो' ही अत्यंत गाजलेली आहे. तिचे सेल्फ पोट्रेट्स जगभरात आजही अभ्यासली जातात. पारंपारिक आणि पाश्चात्य कलाप्रकाराचा सुंदर मिलाफ साधलेल्या भारतीय चित्रकार अमृता शेरगिलनाही भारतीय 'फ्रिडा काहलो' म्हटलं जातं. २० व्या शतकातल्या नव्या कल्पना, नव्या दृष्टीकोनाने आणि नव्या दमाने ज्या चित्रकारांची पिढी निर्माण झाली त्या पिढीतील महान चित्रकारांमध्ये अमृता शेरगिलचा यांचं नांव घेतलं जातं.
२० व्या शतकातील नव्या कल्पना, नव्या दृष्टीकोनाने आणि नव्या दमाने ज्या चित्रकारांची पिढी निर्माण झाली त्या पिढीतील महान चित्रकारांमध्ये अमृता शेरगिल यांचा देखील समावेश होतो.
अमृता शेरगिल यांचं काम अनन्यसाधारण आहे आणि सध्या त्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. याला कारणही तसंच आहे. अमृता शेरगिल यांचं "In the Ladies' Enclosure" हे चित्र तब्बल ३७.८ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. हे चित्र सर्वाधिक महागड्या विकल्या गेलेल्या भारतीय कलाकृतींच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोचलं आहे. Saffronart या नावाजलेल्या लिलाव कंपनीने नुकतंच काही प्रमुख भारतीय चित्रांचा लिलाव केला होता, त्यात अमृता शेरगिल यांच्या या प्रसिद्ध चित्राचाही समावेश होता.








