भारताकडून टोक्यो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या बऱ्याच खेळाडूंमध्ये एक साम्य बघायला मिळत आहे. ते म्हणजे अतिशय खडतर परिस्थिती असूनही आपल्या मेहनतीच्या जीवावर या लोकांनी ऑलिम्पिकपर्यंत धडक मारली आहे. आज अशाच एका खेळाडूची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत.
रेवती वीरामणी या धावपटू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तमिळनाडूच्या रेवती या ७ वर्षे वयाच्या असतानाच त्यांचे वडील वारले तर पुढील एका वर्षात आईचेसुद्धा निधन झाले. रेवती आणि त्यांच्या बहिणीची जबाबदारी आता त्यांच्या म्हाताऱ्या आजीवर येऊन पडली होती.


