अॅपल फोन की अॅपल बॉम्ब???

अॅपल फोन की अॅपल बॉम्ब???

‘ब्रायाना ऑल्वस’ या अॅपलच्या युझरनं काही दिवसांपूर्वी एक विडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या विडीओमध्ये ‘Apple iPhone 7’नं पेट घेऊन फोनच्या मागचे कवर उष्णतेमुळे विरघळताना दिसत आहे. लाखोंनी हा विडीओ पहिला आणि ही बातमी अॅपल कंपनीपर्यंत जाऊन पोहोचली. अॅपलनं मग या फोनला ताब्यात घेऊन आग लागण्यामागची कारणं शोधायला सुरुवात केली आहे.

ब्रायानाच्या मते "फोन वापरात नसताना सकाळी अचानक फोनने पेट घेतला आणि त्यातून धूर येऊ लागला". पेट घेण्याच्या एक दिवस आधीपासून फोनमध्ये बिघाड दिसू लागला होता. तिनं जवळच्या अॅपल स्टोरमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी काही टेस्ट केल्या. पण मग नंतर त्यांनी फोन दुरुस्त झाल्याचं सांगितलं. दुरुस्ती झाल्यावर फोन नीट कामही करू लागला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी फोन चार्जींग होत असताना त्यातून धूर आणि कर्कश्य आवाज ऐकू येऊ लागला. अॅपलला ही बातमी समजल्यावर त्यांनी आग लागण्याची कारणं तपासून पहिली. काहीवेळा दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचा चार्जर अॅपल फोनसाठी वापरला असेल, तर फोन पेट घेण्याची शक्यता वाढते. पण या केसमध्ये ब्रायानाच्या मते ती अॅपल कंपनीचाच चार्जर वापरत होती.

अॅपल फोनला आग लागण्याची ही काही पहिली वेळ नाही. एका ऑस्ट्रेलियन माणसाच्या खिशात अॅपल फोननं पेट घेतल्याची घटना गेल्या काळात ट्रेंडींग होती. या केसला विशेष महत्व देण्याचे कारण म्हणजे याचा व्हिडीओ. विडीओमध्ये सगळं काही साफ दिसत आहे.  त्यामुळं अॅपलला बदनाम करणे हा काही यामागचा हेतू दिसत नाही.

स्मार्ट फोन्स असेच पेट घेत राहिले तर पुढील काळात फोनची नावे अॅपल बॉम्ब ७, सॅमसंग मिसाईल २, अॅसूस ग्रेनेड असे काहीसे दिसून येतील असंच दिसतंय.  त्यापेक्षा आपला नोकिया डब्बा चांगला होता राव! फेकून मारला तर माणूस मरेल पण फोनला ओरखडा पण येणार नाय !!!