पण खरंच, यंत्रं माणसांची अशी सगळी कामं करू शकतील? खरंतर हो, करू शकतील. पण त्यासाठी त्यांना खूप माहिती द्यावी लागेल आणि खूप शिकवावं ही लागेल.
ही सगळी जाहिरात पाहून त्या हॉटेलाला भेट दिलेल्या गार्डियन या इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमीदाराला काय अनुभव आला?
तर तो बातमीदार दुपारी तीन वाजायच्या थोडा आधीच तिथं पोचला. तिथले दोन्ही रोबोट्स- ती बाई आणि डायनॅसोर, दोघेही गप्प. ढिम्म बोलेनात. मग यानं बटनं दाबून पाहिली, बोलल्यावर कदाचित उत्तर येईल म्हणून बोलूनही पाहिलं. पण अंहं.. रोबोट्स ढिम्म. मग एका माणसानं येऊन तीन नंतर ते बोलतील आणि चेक-इन होईल असं सांगितलं. तिथंही डायनॅसोरन "तुम्हांला चेक-इन करायचं असेल तर एक दाबा" असं म्हटलं, पण या बातमीदारानं बटन दाबण्याआधीच हॉटेलातल्या एकुलत्या माणसाने आधी पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची मागणी केली. तो बॅगा नेणारा हमाल रोबोटपण हॉटेलातल्या एकाच विंगेत जातो म्हणे.
थोडक्यात काय, या हॉटेलात माणसं नाहीतच असं नाही. पुरेशी महिती फीड केली नसेल तर बर्याच वेळा नक्की काय करायचं हे रोबोट्सना कळणारदेखील नाही. तरीसुद्धा अशा हॉटेलची कल्पना अगदीच काही वाईट नाही. फक्त माणूस विरूद्ध यंत्र हा वाद मात्र तेव्हाही राहिलच. मला विचाराल तर, आधीचापण यंत्रांच्या इतके आहारी गेलोय, की मला अशा हॉटेलात राहायला फार काही मजा येणार नाही. टाईमपास म्हणून एक-दोनवेळा मी फारतर त्या रोबोट्ससोबत गप्पा मारून येईन.