कृष्ण काळा राधा गोरी - जाणून घ्या हे जोडपं इंटरनेटवर इतकं का गाजतंय??

कृष्ण काळा राधा गोरी - जाणून घ्या हे जोडपं इंटरनेटवर इतकं का गाजतंय??

'सरकारी नोकरीचे फायदे', 'प्रेम आंधळं असतं' आणि  परवाच होऊन गेलेल्या ग्रहणाच्या वेळी 'खग्रास चंद्रग्रहण ' असं जे वाटेल ते बोलून खिल्ली उडवणाऱ्या एका जोडप्याचा  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुमच्याही व्हॉट्सअपवर हा मॅसेज आला असणारच पण, राव हे जोडपं आहे तरी कोण? किंवा हा फोटो फेक तर नाही ना? फोटोशॉप तर नाही ना? वगैरे वगैरे...   
मंडळी आज आपण बघणार आहोत, या व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या या दोन व्यक्ती आहेत तरी कोण?

तर मंडळी फोटोमध्ये दिसणारा हा सावळा माणूस कोणी साधासुधा नाही बरं का!  याचं नाव आहे 'एटली कुमार' उर्फ 'अरुणकुमार'. हा अरुणकुमार तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि  पटकथा लेखक आहे. राव 'थ्री इडियट्स ' या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक बनवणाऱ्या 'एस. कुमार' यांचा हा असिस्टंट. 

अरुण कुमारने आपल्या करियरची सुरुवात  'राजा राणी' या फिल्म पासून केली. हा सिनेमा त्यानेच लिहिला आणि  दिग्दर्शित केला होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या पहिल्याच फिल्मने दक्षिण भारतात तब्बल ५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचा आगामी 'मेरसल' हा सिनेमा ऑकटोबर मध्ये रिलीज व्हायला सज्ज आहे.  

स्रोत

हे झालं या 'काळ्या' मुलाबद्दल.  पण ही मुलगी कोण आहे, जिचं प्रेम आंधळं आहे म्हणे?

हिचं नाव आहे कृष्णप्रिया. कृष्णप्रिया टेलिव्हिजनवर काम करणारी अभिनेत्री आहे. साऊथ मधला सिंघम जर तुम्ही बघितला असेल तर त्यात कृष्णप्रिया तुम्हाला 'दिव्या महालिंगम' च्या रूपात दिसून येईल. अरुणकुमार आणि ती  ८ वर्षांपासून एकत्र होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लग्न केलं. यावेळी लग्नाला  बरीच मातब्बर मंडळी हजर होती. 


तर मंडळी थोडक्यात काय तर हे जोडपं अस्सल आहे आणि आज सुखाने नांदतंय. काही लोक यांच्यावर मीमे बनवतात पण या सगळीकडे दुर्लक्ष करून हे लोक फक्त आपलं काम करत आहेत.