फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव..

लिस्टिकल
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव..

औरंगाबादचं फटाका मार्केट गेल्या १५-२० वर्षांपासून जिल्हा परिषद ग्राऊंडवर भरत आहे. आज सकाळी अचानकच तिथं एका छोट्याशा दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता सुमारे २०० दुकानं आगीत भस्मसात झाली. सुदैवानं यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची अद्याप बातमी आलेली नाहीय. आता यावर चौकशा, कारणं हे सगळं होत राहील. पण इतकं भरवस्तीत फटाका मार्केट असायला हवं होतं का मुद्दा तसाच राहील. 

या आगीनं पाहता-पाहता रौद्र रूप धारण केलं, फटाके उडून आजूबाजूच्या वस्तीत पसरले आणि धुरानं सारा परिसर भरून गेला. आमच्या औरंगाबादच्या वाचकांनी या घटनेचे फोटोज आणि व्हिडिओज आमच्यासोबत शेअर केले आहेत.