बोनस म्हणून कार आणि घर देणारा व्यापारी; बॉस असावा तर असा!!

बोनस म्हणून कार आणि घर देणारा व्यापारी; बॉस असावा तर असा!!

कदाचित ही बातमी तुम्ही गेल्या वर्षीही ऐकली असेल. हो.. सावजीभाई ढोलकिया नावाचे हे सुरतमधले हिऱ्यांचे व्यापारी दिवाळीचा बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना कार, घरं, आणि दागिने देत आहेत!! 

            सावजीभाई आपल्या 'हरेकृष्णा इंडस्ट्रीज'च्या माध्यमातून हिरे आणि टेक्स्टाईल क्षेत्रात व्यापार करतात. त्यांच्याकडे एकून ५५०० लोक काम करतात.  त्यातल्या १६६० जणांच्या हाती यावर्षी हे बोनसचं घबाड लागलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा सावजीभाईंनी आपल्या १७१६ उत्कृष्ट कर्मचार्‍यांना अशी बक्षीसं बोनस म्हणून दिली होती. यावर्षी १२६० कर्मचार्‍यांना तब्बल ५१ करोड रुपयांच्या कार दिल्या जातील. तर ४०० जणांना घर आणि ५६ जणांना दागिने मिळणार आहेत. घरांचा संपूर्ण ईएमआय आणि डाऊन पेमेंट कंपनी देणार आहे.. 

          आपल्या प्रत्येक कर्मचार्‍याकडे स्वतःची गाडी आणि घर असावं असं सावजीभाईंना वाटतं. तब्बल ६००० कोटींची मालकी असणार्‍या याच इंडस्ट्रीमध्ये एकेकाळी सावजीभाई १६९ रुपये पगारावर काम करायचे. हे विसरू नका !!