आंतरराष्ट्रीय योग दिवस: रामदेव बाबा जेव्हा कैलाश खेर च्या गाण्यावर नाचतात तेव्हा व्हिडिओ व्हायरल होणारच

आंतरराष्ट्रीय योग दिवस: रामदेव बाबा जेव्हा कैलाश खेर च्या गाण्यावर नाचतात तेव्हा व्हिडिओ व्हायरल होणारच

तुम्ही रामदेव बाबांचा कैलाश खेरच्या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ पाहिलात? नाही ना? मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात. योग गुरू आणि पतंजली या आयुर्वेदिक साम्राज्याचे प्रमुख बाबा रामदेव हे एक मजेदार व्यक्तिमत्त्व आहे. कैलाश खेरच्या गाण्यावर ताल धरताना त्यांची एनर्जी लेव्हल ही एखाद्या तरुणालाही लाजवणारी आहे. 

तुम्ही कैलाशचे 'बम लहरी' हे गाणे ऐकले असेलच. काय, नाही ऐकलेय? चला आत्ताच्या आत्ता तुमच्या टू डु लिस्ट मध्ये टाका बरं. तर दिल्लीमध्ये जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात हे गाणे लागले असता बाबा रामदेव आपल्या फुल्ल एनर्जीने नाच/योग करायला लागले. आजवर योग हे एका शांत जागी ध्यान करायचे प्रकरण वाटणाऱ्या तुम्हा आम्हाला हा नवा प्रकार नक्कीच अचंबित करणारा आहे.