आज आंतरराष्ट्रीय योग दिन. रोज प्राणायाम करावा. योगासने करावी. योगाने चित्तवृत्तीवर काबू मिळवावा आणि जीवन म्हणजे आजकाल आपण ज्याला 'लाईफ' म्हणतो ते सर्वांगसुंदर बनवावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण "ऑफीसमुळे टाइमच नाय भेटत " अशी तक्रार करत टाळाटाळ होत राहते. ही टाळाटाळ कायमची बंद करण्यासाठी "योगा इन द वर्कप्लेस" हे पुस्तक आजच्या मुहूर्तावर वाचा आणि काम करताकरता योगी व्हा.
शमीम अख्तर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात कर्मचारी कार्यालयात काम करताना वेगवेगळी आसने, मुद्रा कशी करू शकतात याची सचित्र माहिती दिलेली आहे. बैठी कामे करणार्यांसाठी उपयुक्त सुसंगत जीवन पध्दती आणि उत्पन्न होणार्या व्याधी यावर विशेष मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. चला, एक सचित्र फेरफटका बघू या.









