काही दिवसांपासून सगळ्याच बँकांमध्ये एक अतिमहत्वाची सूचना दिसतेय.. "2 AQ आणि 8 AC सिरीज असलेल्या १००० रूपयांच्या नोटा स्वीकारू नका" अशी.
हो, कारण ही सिरीज असलेल्या हजाराच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या हमखास बनावट आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, देशात तब्बल 2000 करोड रूपये किंमतीच्या हजाराच्या नकली नोटा फिरत आहेत. त्यांची सिरीज AQ आणि 8 AC आहे. सद्या दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी आतापर्यंत या नोटांनी अनेकांच्या खिशात प्रवेश केला असेल.

या नोटांचं 'उपद्रवमूल्य' वाढू नये यासाठी सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना या सिरीजच्या नोटा न स्वीकारण्याचं आवाहन केलंय. तेव्हा तुमच्याकडे जर अशी हजाराची नोट आली तर ती लागलीच परत करा. आणि मित्र, नातेवाईकांना पण सांगा. लक्षात ठेवा.. 2 AQ आणि 8 AC!!
