यातली भोंडल्याची कोणती गाणी तुम्हाला आठवताहेत?

लिस्टिकल
यातली भोंडल्याची कोणती  गाणी तुम्हाला आठवताहेत?

लहानपणी हस्त नक्षत्रात तुम्ही नक्कीच भोंडला खेळला असाल.  सुरूवात तर ती सोळा फळं आणि धान्याची कणसं गोळा करून त्याची माळ बनवण्यापासून व्हायची. मग ती पाटावर हत्ती काढायची खटखट.  त्याचं पोट आणि सोंडेचं गणित जमता-जमता जीव मेटाकुटी यायचा ना? मग रोजची खिरापत!! न ओळखता येण्यासारखं रोज-रोज काय न्यायचं हा मोठाच प्रश्न असे.   डब्याचा वास घेऊन आणि वाजवून खिरापत ओळखायची. काहीजणी तर त्यात इतक्या हुशार असायच्या की पहिल्या फटक्यातच खिरापत ओळखायच्या. आणि मग ती खिरापत वाटून खाणं!! नुसती धम्माल. 

काही ठिकाणी याला हादगा म्हणतात तर काही ठिकाणी भोंडला. नांव काहीही असो, गाणी मात्र तीच ती असायची. माहेरवाशिणींची, त्यांचं सुखदु:ख वाटणारी, सासरच्या तर कधी वेडगळ नवर्‍याच्या तक्रारी करणारी. हळूहळू रोजची म्हणायची गाणी वाढली तरी गाण्यांचा इतका मोठा खजिना हाताशी असायचा की सोळाव्या दिवशी कोणती सोळा गाणी म्हणायची असा प्रश्न पडत नसे..  आठवाताहेत ना, "श्रीकांता, कमळाकांता , अस्सं कसं झालं?", "कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून", "आड बाई आडोणी, आडाचं पाणी खारोणी".. ही सगळी गाणी?

तर या शनिवारी बर्‍याच ठिकाणी महाभोंडल्याचे कार्यक्रम होत आहेत. त्या निमित्ताने बोभाटा.कॉम घेऊन आलेय भोंडल्याची काही गाणी. तुम्हाला माहित असलेली गाणी तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि आपण सारे मिळून ही गाणी एकत्र संकलित करूया..

ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा

अक्कण माती चिक्कण माती..

अक्कण माती चिक्कण माती..

शिवाजी आमुचा राणा..

शिवाजी आमुचा राणा..

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू..

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू..

कारल्याचा वेल लाव गं सुने..

कारल्याचा वेल लाव गं सुने..