आज रिलीज होत आहेत हे 5 चित्रपट : तुम्ही कोणता बघणार ?

लिस्टिकल
आज रिलीज होत आहेत हे 5 चित्रपट : तुम्ही कोणता बघणार ?

आज रिलीज होत आहेत एकूण पाच चित्रपट. त्यापैकी दोन मराठी आहेत. त्यामुळे आजच्या शुक्रवारी बॉक्स अॉफिसवर जाम धुमाकूळ होणार आहे... 

जाऊ द्या ना बाळासाहेब

'डॉल्बीवाल्या, बोलाव तुझ्या डिजेला' आणि 'बेबी ब्रिंग इट अॉन' या अजय-अतुलच्या गाण्यांनी आधीच मोठी लोकप्रियता मिळवली असल्याने हा चित्रपट मोठी गर्दी खेचू शकतो. चित्रपटाची निर्मिती अजय-अतूल यांचीच आहे आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णीने केलंय. चित्रपटात गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम, विभावरी देशपांडे, सई ताम्हणकर, रिमा लागू, मनवा नाईक अशी तगडी स्टारकास्ट आहे.

फॅमीली कट्टा

या मराठी कौटुंबिक चित्रपटाच्या माध्यमातून वंदना गुप्ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. हसत खेळत आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा बोध हा चित्रपट देतोय. दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं असून वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मिर्झ्या

या हिंदी रोमान्स, थ्रिलर चित्रपटातून अनिल कपूरचा चिरंजीव हर्षवर्धन कपूर पदार्पण करतोय. चित्रपटाला राकेश मेहरा यांचं दिग्दर्शन, गुलजार यांची कथा आणि शंकर-एहसान-लॉय यांचं संगित आहे. चित्रपटात तुम्हाला ओम पुरी सुद्धा दिसतील.
 

एमएसजी - दि वॉरीयर लायन हार्ट

या चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथा, संगीत, मेकअप, एडिटींग, संवाद, केशभूषा, नृत्यदिग्दर्शन, सिनेमेटोग्राफी इत्यादी 32 आघाड्या  एकट्या गुरमीत राम रहिम सिंग इन्सान यांनीच सांभाळल्या आहेत!!! हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू आणि इंग्लिश अशा 4 भाषेत रिलीज होतोय. यामध्ये हिरो एलियन्स विरुद्ध लढताना दिसेल.

मित्रमैत्रिणींच्या मोठ्या ग्रुपसोबत धमाल टाईमपास करायचा असेल , तर हा सिनेमा अगदी उत्तम आहे..

तुतक तुतक तुतिया

प्रभु देवा, तमन्ना आणि सोनू सुद अभिनीत हा हॉरर-थ्रिलर चित्रपट आज तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाला तामिळ मध्ये 'देवी' आणि तेलुगू मध्ये 'अभिनेत्री' असं नाव दिलं गेलंय. चित्रपटाला साजिद-वाजिद या जोडीने संगीत दिलंय. लोकांना या चित्रपटाचा ट्रेलर बराच आवडलाय.