ही जाहिरात आहे हरियाणातल्या रोहतकमधल्या तपस्या पराठाची.
बरेचजण ही पैज जिंकायला म्हणून आले आणि हात हलवत परत निघून गेले. आजवर फक्त दोनच लोकांना हे साध्य करता आलंय. एकाने ४० मिनिटांत ३ पराठे खाल्ले तर दुसर्याने ५० मिनिटांत ४!! इतके पराठे सहजपणे खाता न येण्याचं कारण आहे त्यांचा आकार. या पराठा हाऊसचा एक-एक पराठा आहे दीड ते दोन फूट व्यासाचा आणि कमीत कमी एक किलो वजनाचा! त्यामुळं इथला एक पराठा हा चार पराठ्यांइतका भारी असतो.
इथल्या पराठ्यांची ख्याती इतकी पसरलीय की हे दीड-दोन फूट व्यासाचे पराठे रोज किमान दीडशे तरी विकले जातातच. असा छान तुपाने माखलेला खरपूस सोनेरी रंगावर भाजलेला गरामागरम पराठा खाण्यात मजा आहे. पाहा, जर हिंमत असेल तर ५० मिनिटांत तीन पराठे खा आणि मग आयुष्यभर पोटाची चिंताच नाही!!
