पाकिस्तानी चहावाला आणि नेपाळी भाजीवाली  : दोघांच्यावर झालंय इंटरनेट फिदा!! 

पाकिस्तानी चहावाला आणि नेपाळी भाजीवाली  : दोघांच्यावर झालंय इंटरनेट फिदा!! 

कधी कधी कोळशाच्या खाणीतही हिरा सापडतो असं म्हणतात. या जगातही असे अनेक लोक असतील ज्यांचे अंतर्बाह्य सुंदर पैलू या जगाच्या वर्दळीत झिजत असतील आणि कोणी त्यांच्याकडे लक्षही देत नसेल. पण इथे एका सामान्य चहावाल्या तरूणाला मात्र आपल्या आकर्षक निळ्या डोळ्यांमुळं मोठी लॉटरी लागलीय.... 

पाकिस्तानी फोटोग्राफर जिया अली यांनी इस्लामाबादमधल्या अर्शद खान नावाच्या या सामान्य चहावाल्याचे फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर शेअर केले. आणि बघता बघता त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे वायरल झाले. 'हॉट पाकिस्तानी चायवाला' या उपाधीसोबत अरशद रातोरात सेलिब्रिटी बनलाय. सोबत जगभरातला मिडीयाही त्याचा गाजावाजा करायला कुठं कमी पडलेला नाही. अर्शदला आता अनेक टीव्ही शोची निमंत्रणं येत आहेत. मेकओव्हर केलेल्या अर्शदचे फोटोही लोकप्रिय होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे इस्लामाबादमधल्या एका अॉनलाईन शॉपींग स्टोअरने आणि एका फिटनेस वेबसाईटने अर्शदला आपला मॉडेल म्हणून निवडलं आहे. अर्शद आता एका रात्रीत झगमगीत मॉडेल बनलाय...

          दुसरीकडे नेपाळच्या अशाच एका भाजी विकणाऱ्या सामान्य तरूणीनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. कोणीतरी तिचे फोटो काढून ट्विटरवर शेअर केले आहेत आणी अर्शदप्रमाणेच तिच्याही सौंदर्यावर जगभरातली सोशल मिडीया घायाळ झाली आहे. अनेकजण तिच्या निरागस आणि सुंदर चेहर्‍यावर कौतुकरुपी कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पण तिचं नेमकं नाव-गाव मात्र अजून कळालेलं नाही. कदाचित तिलाही आता मोठमोठ्या अॉफर्स येऊ शकतात. 

         एकंदरीत या दोघांचंही नशीब आता उघडायच्या वाटेवर आहे. सोशल मिडीयाचा हाही एक फायदाच म्हणायचा ना ??