एक कप काॅफीसाठी सत्तर डाॅलर तुम्ही मोजाल का? म्हणजेच आपल्या रूपयांत गणित करायचं तर एका कपासाठी साडेचार ते पाचहजार रूपये!! अहो, सत्तर डॉलर तर लांबच राहिले पण जर तुम्हाला कळले की ही कॉफी कशी तयार केली जाते तर तुम्ही कॉफी पिणेच सोडून द्याल .
ही कॉफी तयार केली जाते हत्तीच्या विष्ठेतून वेचलेल्या काॅफीेच्या बियांपासून .
वाचून धक्का बसला ना ?
हो. हे खरं आहे!!! हत्तीच्या विष्ठेतून वेचलेल्या काॅफीच्या बियांपासूनबनवली जाणारी काॅफी सर्वात महाग किंमतीच्या कॉफीमध्ये गणली जाते. हिचं नांव आहे ब्लॅक आयव्हरी कॉफी.
हत्तीला एखाद्या फळाच्या गरात मिसळून या काॅफीच्या बिया खायला दिल्या जातात. हत्तीच्या पचन मार्गातून जाताना या बिया आंबतात व त्यातील सेल्युलोजचे विघटन होऊन त्याचे शर्करेत रूपांतर होते. यामुळे त्या कॉफीला एक वेगळी चव येते . यानंतर हत्तीच्या विष्ठेतल्या या बिया वेचून , धुवून, वाळवून व नंतर भाजून त्याची काॅफी पावडर बनवली जाते.
यासारख्याच दुसर्या काही कॉफ्या मांजरीच्या आणि माकडाच्या विष्ठेतून बिया काढून पण बनवल्या जातात. आणि आश्चर्यकारक बाब ही, ही असल्याच सगळ्या कॉफ्या जगात अतिमहाग आहेत. मग काय ठरवलंत ? ह्यापुढे पण कॉफी पिणार ना ?
