गेल्या आठवड्यात तुम्ही बोभाटाच्या बागेत आला होतात तेव्हा बर्याच ओळखीच्या, पण अनोळखी वृक्षांशी आपला परिचय झाला होता. कदाचित बागेत फिरताफिरता कोणत्या जंगलात अडकलो असंही तुम्हाला वाटलं असेल. पण आजच्या यादीतल्या वृक्षांची नावं वाचली की तुम्हाला अगदी गावाजवळ आल्यासारखं वाटेल. या मध्यम आकाराच्या आणि उंचीच्या वृक्षांमध्ये अनेक ओळखीची नावं तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ :रिठा, पांगारा, कवठ, मोहा, खैर, शेवगा!!
देशी वृक्ष अभियानाच्या अंतर्गत आज यातल्या काही वृक्षांची अधिक माहिती वाचूया! अर्थातच, संपूर्ण यादी लेखाच्या शेवटी वाचायला मिळेल.








