इंग्रज भारतातून तर गेले, पण त्याआधी आपल्या देशातील अनेक अमूल्य गोष्टी त्यांनी भारतातून नेल्या. त्यांनी आपल्याकडून काय काय नेलं आहे याची यादी आम्ही तुम्हांला यापूर्वी दिली आहेच! त्या गोष्टी मागूनही काही परत मिळत नाहीत, पण आपल्या चोरीला गेलेल्या गोष्टी मात्र नुकत्याच परत मिळाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात इंग्लंडने श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या १५ व्या शतकातल्या मूर्त्या भारताला परत केल्या आहेत. या मुर्त्या १९७८ साली तामिळनाडूमधून चोरीला गेल्या होत्या. लंडन येथे झालेल्या एका डिजिटल समारंभात भारताचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या उपस्थितीत या मूर्त्या देशाला परत करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये भारताची जगभरात शक्ती वाढत आहे, त्याचा परिणाम म्हणून आजवर 50 हून अधिक मूर्त्या भारतात परत आणण्यात यश आले आहे.

