बसमध्ये छेडखानी करणाऱ्यास या मार्शल आर्ट्स प्रवीण महिलेने जे काय केलं ते प्रत्येक मुलीने शिकून घेतलं पाहिजे

लिस्टिकल
बसमध्ये छेडखानी करणाऱ्यास या मार्शल आर्ट्स प्रवीण महिलेने जे काय केलं ते प्रत्येक मुलीने शिकून घेतलं पाहिजे

रस्त्यावरुन जाताना छेड काढली जाणं हे जगात सगळीकडे घडत असतं. याच वर्षी आपण आसाममध्यल्या मुलीने असं करणाऱ्या माणसाला धडा शिकवण्याची बातमी वाचली होती. 

रस्त्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला धडा शिकवणाऱ्या भावनाने काय धाडस केलं हे वाचलंत का?

 सध्या असाच एक प्रसंग ब्राझील या देशात घडला आहे.

बेलेम या शहरात एक महिला जिमला जाण्यासाठी बसमधून जात होती. तेव्हा एका व्यक्तीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पण या भावड्याला माहीत नव्हते की ती महिला मार्शल आर्ट एक्सपर्ट आहे. दिली ना मग दे दणादण्!! या बसमधील सर्व घटनाक्रम दुसऱ्या एका प्रवाशाने रेकॉर्ड केला आहे.

या व्हिडिओत ती महिला त्याला मागून गळ्यात अशी पकडते की भावाला दिवसा चांदणे दिसतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो इसम महिलेला मागून अंग लावत होता. महिलेने आधीतर त्याला नाकावर जोरदार ठोसा लगावला. नंतर त्याला गळ्यात घट्ट पकडून पार खाली बसवून मग ड्रायव्हरला गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितली.

आता ब्राझीलमध्ये पण छेडखानीसाठी कायदे जबरदस्त आहेत. या कामात एखादा ५ वर्षांपर्यंत जेलमध्ये जाऊ शकतो. म्हणजे या भावाला बसमध्ये जबरदस्त मार बसला या बरोबरच तो आता कायदेशीर बाबींमध्ये सुद्धा चांगलाच गुंतू शकतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांची छेडखानी करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. यात त्यांना जर धडा शिकवला गेला नाही तर त्यांची हिंमत वाढते. पण काहींना मात्र कधीकधी जन्माची अक्कल येईल असा धडा मिळतो.

उदय पाटील