कार शौकीन गाडी घेताना ज्या गोष्टींचा सर्वप्रथम विचार करतात. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कारचा वेग. भारतात पण वेगवान कार्सचे चाहते कमी नाहीत. एका भारतीय कंपनीने आता थेट जगातील सर्वात वेगवान कार बनवली आहे.
एकोंक असे या कारचे नाव आहे. वाझीरानी ऑटोमोटिव्ह या कंपनीने ही कार तयार केली आहे. कंपनीने कारविषयी केलेला दावा थक्क करणारा आहे. अवघ्या २.५४ सेकंदात ही कार ताशी १०० चा स्पीड घेते. याच कारणाने ही कार जगातील सर्वात वेगवान कार म्हटली जात आहे.
या कारला छप्पर नाही आणि ही एक सीटर कार आहे. डिझाईनच्या बाबतीतही अफलातून अशी आहे. यात असलेली भन्नाट बाब म्हणजे ही कार अल्टोपेक्षा कमी वजनाची आहे. यातही विशेष म्हणजे ही कार इलेक्ट्रिक आहे.


