भौ लग्नात वरातीत नाचायला कोणाला नाय आवडत? नागीण डान्स तर सगळ्यांचा फेवरेट. पण हाच डान्स एका नवरदेवाला महागात पडलाय राव! आता नागीण डान्स करणं हा काय गुन्हा हाय का, आणि आपलंच लग्न असल्यावर कोणी बी नाचणारच ना? पण या मुलीने लग्न का मोडलं याचं कारण बघून तुम्हीही तिची तारीफ कराल.
ही केस अशी हाय की प्रियांका त्रिपाठी या मुलीचं लग्न अनुभव मिश्रा नावाच्या मुलाशी ठरलेलं. त्यानुसार लग्न सोहळ्याच्या दिवशी मुलगा वरात घेऊन मुलीच्या दाराशी आला. त्यादिवशी एका विधीदरम्यान कोणी तरी नागीन डान्स लावल्यानंतर या नवरदेवाच्या अंगात जणू नागीन संचारली आणि तो मित्रांमध्ये जाऊन नाचायला लागला. आता हे जेव्हा त्या मुलीने बघितलं तेव्हा तिला त्याची लाज वाटली आणि तिने तिथेच लग्न मोडलं.
आता इथे डान्स करणं चुकीचं नसून दारू पिऊन टल्ली होऊन नाचणं चुकीचं आहे. होणारा नवरा दारू पिऊन नाचत असल्याने हा मुलगा आपल्या लायकीचा नसल्याचं प्रियांकाच्या लक्षात आलं.
तिने लग्नाला नकार दिल्यानंतर साहजिकचं तिला सर्वांनी समजावलं. पण तिने रागात कुणाचंच ऐकलं नाही आणि शेवटी नवरी शिवाय नवरदेव घरी निघून गेला. काही दिवसात प्रियांकाचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं.
काही महिन्यांपूर्वी एका मुलीने मुलगा गुटखा खातो म्हणून लग्न मोडलं होतं आणि आता दारूच्या कारणावरून मुलीने लग्न मोडल्याच बघून बदल घडतोय हे दिसून येतंय मंडळी.
