सध्या सर्वच सरकारी कार्यालये टेक्नोसॅव्ही होत आहेत. पोलिसांना देखील आपले काम सोपे होण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. यासाठी मग ट्विटर आणि इतर समाज माध्यमांची मदत घेऊन पोलीस लोकांना सतर्क करणे, माहिती पुरवणे यासारख्या गोष्टी करत असतात. काही पोलीस दलांचे तर स्पेशल अॅप आहेत.
ही अॅपची जाहिरात आहे की साऊथचा ऍक्शनपट...केरळ पोलिसांचा धमाकेदार व्हिडीओ पाहिला का?


केरळ पोलिसांनी देखील स्वतःचे खास ऍप तयार केले आहे. या अॅपचं नाव आहे ‘पोल अॅप’. हे अॅप खास लोकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे. आता अॅप’ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात तर आलीच, नाही का? केरळ पोलिसांनी या ऍपची जाहीरात तयार केली. ती जाहिरात बघीतल्यावर मात्र साऊथच्या सिनेमांचे भले भले सुपरस्टार चक्कर येऊन पडतील. ही जाहिरात त्या अॅपसाठी नाही, तर त्यातल्या ऍक्शन सीन्ससाठीच जास्त वायरल होत आहे.
केरळ पोलिसांना दाखवायचे होते की कसे पोल ऍपवर एका क्लिकसरशी पोलीस तुमच्या मदतीला हजर होतात. पण हे दाखवण्याचा नादात त्यांनी एक जबरदस्त असा ऍक्शन सिन तयार केला. हा सीन एवढा जबरदस्त झाला आहे की तो लोकांच्या लक्षात राहिला.
आम्ही काय तुम्हाला अधिक सांगत नाही. तुम्ही स्वतः ही जाहिरात बघा आणि आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कशी वाटली केरळ पोलिसांची डोक्यालिटी ते कळवा...